मराठी गाण्यावरून मनसे आक्रमक ः “माय मराठी”ला नख लावाल तर अंगावर जाऊ… : गजानन काळे
![MNS aggressive over Marathi song: If you nail "My Marathi", we will be killed...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Gajanan-Kale-MNS-768x470.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
हॉटेलमध्ये मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हॅाटेल व्यवस्थापकाला बेदम चोप दिला आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर नवीमुंबई पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.
हॉटेलमध्ये मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हॅाटेल व्यवस्थापकाला बेदम चोप दिला आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर नवीमुंबई पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. “असे किती ही गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण ‘माय मराठी’ला नख लावाल तर अंगावर जाऊ”, असा इशारा मनसे नेते गजानन काळे यांनी दिला आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून इशारा दिला आहे. “मराठी गाणी लावा हा अट्टाहास केला म्हणून नवी मुंबई महाराष्ट्रसैनिकांवर गुन्हा दाखल. असे किती ही गुन्हे दाखल झालेत तरी चालतील पण “माय मराठी”ला नख लावाल तर अंगावर जाऊच…पहिले हात जोडून आणि नाही ऐकले तर हात सोडून…मनसे स्टाईल”, अशा शब्दांत गजानन काळे यांनी इशारा दिला.