Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

पिंपरी-चिंचवडसह भोसरीमध्ये आमदार महेश लांडगे यांचा करिष्मा कायम!

महापालिका निवडणूक : भोसरी मतदार संघातील 48 पैकी 35 जागांवर वर्चस्व

पिंपरी-चिंचवड: शहरातील राजकारणात भोसरी विधानसभेत सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे अजित पवार यांना थेट आव्हान म्हणून आमदार महेश लांडगे यांचा भोसरी विधानसभेकडे राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली. यामुळे येथील जवळपास 12 प्रभागातील उमेदवारांची लढाई अटीतटची ठरली. या लढतीमध्ये भाजपाच्या 48 जागांपैकी 35 जागांवर भाजपाचे पारडे जड ठरले. दरम्यान, गत वर्षी 32 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीत 3 नगरेवकांमध्ये वाढ झाली आहे. हा सर्व विजय आमदार लांडगे यांचा डाव असल्याचे बोलले जाते.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी, शिवसेना या पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणला होता. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला किंबहुना आमदार महेश लांडगे यांना अडचणीत येणार होती. त्यातच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सर्वच उमेदवरांच्या तोंडाचे पाणी पळवले. त्यापैकी प्रभाग क्रमांक 1,5,7,8 या प्रभागात राष्ट्रवादीचे पारडे जड ठरले. तर, शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार व विधानसभेचे उपसभापती असलेले अण्णा बनसोडे यांच्या पुत्राचा विजय हा भोसरीतील विजयाच्या गडाला तडा जाणार ठरला.

कारण, प्रभाग 9 या ठिकाणी भाजपाचे सूंपर्ण पॅनल पराभूत झाले होते. हे पॅनल निवडणून आणण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी लक्ष घातले होते. त्यासाठी काँग्रसेचे माजी नगरेसवक सद्गुरु कदम यांना पक्षात प्रवेश दिला होता. पण, हा गड भाजपाला राखता आला नाही. प्रभाग 8 या ठिकाणी देखील राष्ट्रवादी वरचढ ठरली असून, चारपैकी दोन राष्ट्रवादीच्या नगरेसवकांची खाते उघडली आहेत. या ठिकाणी भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व निलम लांडगे यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे प्रभाग 1 साठी अटीतटीची लढत ही राष्ट्रवादीने खेचून आणली. या प्रभागात केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तसेच, आमदारांच्या बालेकिल्ल्यातील एक जागा निसटली असून, तेथे राष्ट्रवादीचे विराज लांडे विजयी झाले.

आमदारांच्या प्रभागात एक जागा निसटली

  • प्रभाग 1, 7 आणि 8 मध्ये राष्ट्रवादीचा करिश्मा
  • प्रभाग 9 मध्ये भाजपाच्या संपूर्ण पॅनलची पिछेहाट
  • निवडणुकीच्या तोंडावर आयात उमेदवर चमकले
  • राष्ट्रवादीला 12 जागांवर समाधान
  • भाजपातील बंडखोरांचा पराभवाचा धक्का
  • भोसरीतील चार दिग्गजांचा नवख्या उमेदवरांकडून पराभव

पाच जागांवर भाजपाचे वर्चस्व कायम

भोसरीतील पाच जागांवर भाजपाचे वर्चस्व कायम राखले आहे. त्यापैकी प्रभाग दोन, तीन, चार या प्रभागात बाजी मारत वर्चस्व कायम राखले आहे. या ठिकाणी भाजपाला जास्त मताधिक्य मिळाले. तर, सहा आणि दहा या दोन्ही ठिकाणी आघाडी घेतली. तर, अन्य जागेवर काहीशी पिछेहाट झाली असली तरी, भाजपाचे प्रत्येकी दोन ते तीन जागा राखल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button