breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

कोकण पूरग्रस्त गावागावांमध्ये पोहचतोय आमदार लांडगे यांचा ‘एक हात मदतीचा’

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार चिपळूण येथील उमरठ ते चांदके, खोपड, धवळपुर या गावात मार्शल ग्रुपच्यावतीने ‘एक हाक मदतीचा’ देत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

मार्शल ग्रुपच्यावतीने ‘एक हाक मदतीचा’ हा उपक्रम उमरठ ते चांदके,खोपड,धवळपुर या गावात राबविण्यात आला. या गावाचा संपर्क पुर्णपणे तुटलेला होता. गावात अक्षरशः नागरिकांना पिण्यासाठी पाणी देखील मिळालेले नव्हते. ही माहिती मार्शल ग्रुपला मिळाली. तातडीने या ग्रुपच्या तरुणांनी गहू, तांदूळ, बाजरी, साखर, तेल पाकीट, कांदा मसाला पुडी, सांबर मसाला, कोलगेट, ब्रश, मेणबत्ती, माचीस बॉक्स, मॅगी पॅकेट, बिस्कीट, चहापावडर, पाणी बॉटल, कपडे, कांदे असे 50 गावांमध्ये 50 किट वाटण्यात आले.

यामध्ये तुषार थोरात, सतिश जरे, निवृत्ती आहेरकर, सचिन होले , संपत मुंडे , अमित कदम, योगेश शिंदे, अंकुश हेगाडे , मंगेश सव्वालाखे, सत्यंम सोनवणे, बबन शिंदे , विठ्ठल महाराज गवळी, प्रविण जरे यांनी सहभाग घेतला. या सर्व तरुणांचे उमरठ गावचे सरपंच चंद्रकांत कळंबे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button