आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरला नोटीस पाठवणार; नेमकं कारण काय?
मुंबई : प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. दरम्यान, बच्चू कडू यांनी थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात ३० ऑगस्टपर्यंतची मुदत सचिन तेंडुलकरला दिली होती, असं बच्चू कडू म्हणाले.
सचिन तेंडुलकरला नोटीस पाठवण्यामागे नेमकी कोणती बाब कारणीभूत ठरली? याबाबत बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, आम्ही ३० तारखेला सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवणार आहोत. त्यांना आम्ही ३० तारखेपर्यंत वेळ दिला होता. तोपर्यंत त्यांनी यासंदर्भात त्यांची कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आम्ही वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवणार आहोत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महानगपालिकेला केंद्र सरकारचा ‘गव्हर्नन्स’ पुरस्कार!
भारतरत्न असणाऱ्या माणसानं कोणत्या जाहिराती कराव्यात किंवा करू नयेत याच्या काही आचारसंहिता आहेत. त्यामुळे फक्त पैशांसाठी जाहिरात करून पुन्हा तरुणाईला या ऑनलाईन गेमिंगला बळी पाडलं जात असेल तर त्याचा आम्ही विरोध करू, असं बच्चू कडूंनी नमूद केलं. तसेच, ३० तारखेला पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करू, असंही बच्चू कडू म्हणाले.