breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पंढरपुरात मराठा समाजाच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

  • खा. संभाजीराजे भोसले यांच्या उपोषणाला पाठिंबा

पंढरपुर |

येथील अखिल भारतीय मराठा महासंघाने विविध मागण्यांसाठी बंद पुकारला. या बंदला पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. शहरातील गजबजलेली पेठ,मंदिर परिसरातील दुकाने व इतर ठिकाणी व्यापार पूर्णपणे बंद होता. खा. संभाजीराजे भोसले मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून बंद पुकारल्याचे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खा. संभाजीराजे भोसले हे मुंबई येथे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा महासंघ रस्त्यावर उतरला आहे. मराठा महासंघाने सोमवारी पंढरपूर बंदची हाक दिली. त्यानुसार सोमवारी शहरातील नेहमीची वर्दळ असलेली पेठ, मंदिर परिसर, स्टेशन रोड, चप्पल लाईन आदी भागात शुकशुकाट दिसून आला. तर मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा झाले. मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत घोषणाबाजी केली.

शासनाच्या विरोधात घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली. या वेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून त्यांचे निवेदन स्वीकारले.  पंढरपूर बंदच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या आंदोलनाचा फटका दर्शनाला आलेल्या भाविकांना बसला. दुपारनंतर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडलेली दिसून आली. दरम्यान, खा. संभाजी राजे याना पाठिंबा म्हणून आम्ही शांततेत आंदोलन केले आहे. सरकारने आमाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा मराठ महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button