Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

Mission Assembly Elections:  राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज! 

पुण्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नेतृत्वात पार पडलेल्या स्वाक्षरी मोहिमेत हजारो लोकांचा सहभाग 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पुण्यात पक्षाच्या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर उपस्थित होत्या. पुण्यात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, जिथे हजारो लोकांनी एका पांढऱ्या कॅनव्हासवर स्वाक्षऱ्या करत ‘माझी लाडकी बहीण योजने’ला पाठिंबा देत पुढील ५ वर्षे ही योजना सुरू राहावी अशी इच्छा व्यक्त केली. 

या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे यांनी महायुती सरकारच्या महिला केंद्रीत कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकला. मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानताना “माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण आणि लेक लाडकी योजना यांसारख्या योजना या सरकारनं राबवल्या आहेत. राज्यातील महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. असं सांगतानाच ते म्हणाले की,“अजित दादांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आदिती तटकरे यांच्यासोबत अभूतपूर्व या योजना सुरू केल्या आहेत. कारण, एका मुलीला आपला जीव गमवावा लागला होता, कारण तिचे पालक तिच्या फी पैकी ५०% फी भरू शकत नव्हते. आता वार्षिक ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकार मुलिना मोफत शिक्षण योजनेतून उचलणार आहे.

दि. ११ सप्टेंबर रोजी सुरज चव्हाण यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली. यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही पुण्यात अभियान आयोजित केले होते.

सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा… 

गेल्या काही दिवसांपासून युवक आणि महिला मोर्चासह पक्षाच्या आघाडीच्या संघटना मतदारांशी जोडण्यासाठी निरनिराळ्या उपक्रमांचं आयोजन करत आहेत. युवा नेते सूरज चव्हाण यांनी राज्यातील विविध मतदारसंघात स्वक्षरी मोहीम राबवली आहे. आज त्यांनी वडगाव शेरी विधानसभेत मोहिमेचं नेतृत्व केलं. यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, पुणे युवक शहर अध्यक्ष समीर दादा चांदेरे हे देखील सामील होते. विविध गणेश मंडळांजवळ एक फ्लेक्स लावण्यात आले होते, जिथे योजना सुरू ठेवण्याच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने लोकांनी स्वाक्षरी करत आपला पाठिंबा दिला आहे.  

राष्ट्रवादीला साथ द्या : सुनील तटकरे 

राज्याचे अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, ज्याद्वारे महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेला महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. १.६ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता आधीच प्राप्त झाला आहे. पक्षाच्या इतर आघाडीच्या संघटना जसे की, विद्यार्थी संघटना, सांस्कृतिक आणि सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्याक विभाग यांच्यावरही राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघात या अभियानाचे आयोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला साथ द्यावी, असे आवाहनही सुनील तटकरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button