breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

फाईलमध्ये पैसे का ठेवले? व्हायरल व्हिडीओवर मेघना बोर्डीकरांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या..

मुंबई | सध्या पावसाळी अधिवेशाचा शेवटचा दिवस असून सभागृहात भाजप आमदार राजेश पवार बोलत होते. तर मागील बाकावर बसलेल्या मेघना बोर्डीकर एका फाईलवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. स्वाक्षरी केल्यानंतर त्या पैसे काढतात आणि त्यातील दोन नोटा फाईलमध्ये ठेवतात. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला. त्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी फाईलमध्ये पैसे का ठेवले? असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच आता आमदार मेघना बोर्डीकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा    –      ‘भारतात ‘हम दो हमारे एक’ कायदा हवा’; रामदास आठवलेंचं विधान 

मेघना बोर्डिकर यांचा खुलासा काय?

सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी १००० रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे, असं मेघना बोर्डीकर म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button