उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आमदार सुनील शेळके यांचा ‘‘मास्टर स्ट्रोक’’!
स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची देहु शहरात जब्बो कार्यकारिणी जाहीर

मावळ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देहु शहर शाखेची 160 जणांची जब्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्वाचा भक्कम नमुना असून, यामध्ये कामगार सेल, क्रीडा सेल, सोशल मिडिया सेल, ओबीसी सेल, शेतकरी सेल आदींचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणीची घोषणा देहु शहर अध्यक्ष विवेक काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक भक्कम करण्यासाठी सुनील शेळके यांनी स्वतः मैदानात उतरून संघटन बळकट करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : लागा तयारीला! नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
त्यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांवर वेगाने निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये समाधान असून, “राष्ट्रवादी सुसाट आहे”, अशीच चर्चा सर्वत्र आहे. या जंबो कार्यकारिणीमुळे देहु शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ संघटनात्मक ताकदच वाढवली नाही, तर विविध समाजघटक, युवा, महिलावर्ग आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करून सर्वसमावेशकता जपली आहे.
संघटन, विकास आणि विजयाची त्रिसूत्री!
कार्यकारिणी जाहीर करताना अध्यक्ष विवेक काळोखे यांनी सांगितले की, “या नव्या टीमच्या माध्यमातून देहु शहरात पक्ष अधिक कार्यक्षम, लोकाभिमुख आणि जनतेशी थेट जोडलेला राहील. विकास आणि जनतेच्या हितासाठी ही टीम सतत सक्रिय राहणार आहे.” ही जब्बो कार्यकारिणी म्हणजे केवळ सदस्यांची यादी नाही, तर येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी एक भक्कम रणनिती आहे. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस देहु शहरात नवसंजीवनी घेत आहे.