ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांना उपचारांची गरज

मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी सुरू आहे. अचानकपणे प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सलाईन सुरू करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पुढील काही दिवस उपचारांची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुढचे काही आरामाची गरज आहे. हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरु ठेवण्याचा सल्ला मनोज जरांगे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानकपणे खालावली आहे. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे. प्रकृती पाहता मनोज जरांगे यांना पुन्हा सलाईन सुरू करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या हृदयाची तपासणी सध्या सुरू आहे. टूडी इको, इसीजीसह अत्याधुनिक मशिनद्वारे मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली जात आहे. काल बीड दौऱ्यावर गेल्या पासून अस्वस्थ वाटत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टरांना सांगितलं आहे.

डॉक्टरांनी काय माहिती दिली?
जरांगे पाटील यांना पुढील काही दिवस उपचाराची गरज आहे. मनोज जरांगे पाटील यांची अचानक प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्या विविध तपासण्या केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पुढील काही दिवस रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे, असं मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हा सल्ला दिला आहे. डॉ. विनोद चावरे यांनी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स दिले आहेत.

काही वेळा आधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. तेव्हा आंदोलनातील लढ्यावर त्यांनी भाष्य केलं. तसंच महत्वाचं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तुमची साथ आणि पाठबळ ठेवा, मराठा नेत्यांना पण सांगतो. मी तळतळीने सांगत आहे. हे लोक माझ्या कुटुंबापर्यंत गेले आहेत. मी यांचं षडयंत्र मोडून काढतो. तुमच्या राजकारणासाठी तुम्ही मला एकटे पडू देऊ नका. यांनी जात खिंडीत पकडली आहे. त्यामुळे आपल्याला एकजुटीने लढावं लागणार आहे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button