breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अचानक प्रकृती खालावली आहे. त्यांच्या छातीत दुखू लागलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आंतरवली सराटीत उपचार सुरू करण्यात आले आहेत. रात्री १० वाजता आणि त्यानंतर रात्री १.३०च्या सुमारास मनोज जरांगेंचा ईसीजी काढण्यात आला. डॉक्टरांनी यानंतर महत्त्वाची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

डॉक्टरांनी आंतरवली सराटीत मनोज जरांगेंवर उपचार केले. मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना बरं वाटू लागल्याने शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. ज्यानंतर मनोज जरांगे हे आंतरवलीला पोहचले होते. मात्र रात्रीच त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांचा ईसीजी काढण्यात आला. मनोज जरांगेंना अॅसिडीटी होऊ लागल्याने छातीत दुखू लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हेही वाचा      –      प्रो कब्बडी लीगला मिळाला नवा चॅम्पियन! पुणेरी पलटनचा हरियाणा स्टीलर्सना धोबीपछाड 

मनोज जरांगेंवर खाजगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले आहेत. यावेळी त्यांचा ईसीजी (ECG) काढण्यात आला.तर, ईसीजी नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button