‘येवलेवाल्यापेक्षा बेक्कार शेरोशायरी आपल्याला येते’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल!
![Manoj Jarange Patil said that we get bad poetry than the good one](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Manoj-Jarange-Patil-and-Chhagan-Bhujbal-2-780x470.jpg)
मुंबई | ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेताना छगन भुजबळ यांनी शेरोशायरी केली होती. यावरून मनोज जरांगे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास आंदोलन तीव्र केलं जाईल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, येवलेवाल्यापेक्षा बेक्कार शेरोशायरी आपल्याला येते. आपल्या मराठ्यांचे चार-पाच नेते बेक्कार आहेत. ते तरी कागद बघून वाचतात. आपल्या मराठ्यांचे नेते तर असे आहेत की त्यांना शायरीशिवाय दुसरं काही येतंच नाही. ते टिकूच शकत नाहीत यांच्यासमोर. ते म्हणतात की अंगात ताकद नाही. तुला काय लग्न करायचं आहे का माझ्यासंग. तुला करायचं काय. तू मोजतोच का. डॉक्टर मोजतात मला. मी कधी बोललोय का मला उठून बाथरूमला ने, असंही जरांगे पाटील म्हणाले.
हेही वाचा – सोने-चांदीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर..
कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत, रामराम घालायचा आहे, शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचं आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचं आहे, असे आवाहन तुम्ही आमची भूमिका समजून घ्या, आम्ही १५० वर्षांपासून आरक्षणात आहोत, पण आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्ही आहोत. आता आम्हाला माहिती झालं आहे, त्यामुळे नोंदी पाहून तुम्हीही म्हटलं पाहिजे की द्या मराठा समाजाला आरक्षण, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
१३ जुलैनंतर सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले. तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार म्या पलटी केलंच समजायचं” हे इतके दिवस बोललो नव्हतो. पण आता बोलणं आवश्यक आहे असंही मनोज पाटील म्हणाले. मी अंतरवलीत येण्यासाठी आसूसलेलो होतो, मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचंही जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटलं आहे.