‘मविआ, महायुती दोघं सारखीच, यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं’; मनोज जरांगे पाटील
![Manoj Jarange Patil said that Mavia, like Mahayuti both, defeated the Marathas.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Manoj-Jarange-Patil-2-780x470.jpg)
Manoj Jarange Patil | लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया देशभरात पार पडत असताना मनोज जरांगे पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. प्रकृती बरी नसतानाही मनोज जरांगे पाटील मतदानाचा हक्का बजावण्यासाठी निघाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी आपण कुणालाही पाठिंबा नसल्याचं म्हटलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत कोणत्या एका पक्षाची बाजू घेतलेली नाही. अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी समाजाने पाठबळ लावलेले नाही. आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही सारखेच आहेत. महायुतीला पाठिंबा दिला आहे, ना महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा – अर्थक्रांती जीवन गौरव अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख यांचा पुणे लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल
आपण राजकारणात नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासह कोणाला पाडा किंवा कोणाला पाडू नका, असे जाहीर सांगितले नाही. महाविकास आघाडी अथवा महायुती दोन्ही घटक आपल्यासाठी सारखेच आहेत. या निवडणुकीत आपली कोणतीही राजकीय भूमिका नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.