breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकसभेचा निकाल येताच मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; दिला असा इशारा

Manoj Jarange Patil : लोकसभा निकालात महाराष्ट्राने भाजपच्या मनसुब्यावर मोठे पाणी फेरले. यामध्ये मराठा फॅक्टर अनेक मतदारसंघात प्रभावी दिसला. भाजपच्या काही दिग्गजांना मराठा फॅक्टराचा थेट परिणाम दिसला. अनेक मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे दुखावलेल्या समाजाने मतपत्रिकेतून नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. आता लोकसभा निकालानंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मराठा फॅक्टरची अप्रत्यक्ष आठवण करुन देत असा इशारा दिला.

मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षीच्या मध्यात मोठी घाडमोड घडली. मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाज उभा राहिला. जालना जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य सरकारच्या भूमिकेविषयी जरांगे पाटील यांनी कायम साशंकता व्यक्त केली. त्याचा फटका राज्यात अनेक लोकसभा मतदारसंघात दिसून आला. मराठवाड्यात पण या फॅक्टरच्या माध्यमातून मराठा समाजाने त्यांची नाराजी दाखवून दिल.

हेही वाचा – बच्चा बडा हो गया ! सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर रोहित पवारांचे ट्विट 

मी राजकारणी नाही, निवडणूक जिंकल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे सहज भेटायला आले होते. सरकार मराठ्यांना भित नव्हते. या निवडणुकीत मराठा समाजाने एकवटून दाखवून दिले.आता तरी सरकारने जागे व्हावे, आणि आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. निवडणुकीत मी कोणालाही पाडा म्हटलो नव्हतो. लोकांनी स्वतः हून ही निवडणूक हातात घेतली होती, असा दावा त्यांनी केला.

मराठा आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवली होती. फडणवीस यांच्यावर त्यांचा रोष वेळोवेळी व्यक्त होत होता. फडणवीस ओबीसी नेत्यांच्या अडून राज्यात समाजा-समाजाता द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता त्यांनी फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आता कोणालाही अंगावर घालू नये. लोकसभेला जसा इंगा दाखविला तसा विधानसभेला दाखवेन,असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला. आरक्षण दिले नाहीं तर राज्यातील 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव व्हायला नको होता. महापुरुषांचे वंशज निवडणुकीत पडले नाही पाहिजे. पंकजा मुंडे यांनी पराभवाची कारणे शोधली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button