breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाविकास आघाडीच्या मोर्चाला हिरवा कंदील नाहीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाविकास आघाडीच्या मोर्चाला आडकाठी आणणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मात्र महाविकास आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आता मोर्चाला एक प्रकारे हिरवा कंदिल दाखवला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने जे जे शक्य आहे ते आम्ही करू. पण महाविकास आघाडीच्या मोर्चाला आडकाठी आणणार नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हाकलपट्टी करा, महापुरुषांचा अपमान थांबवा यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. भायखळा ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. त्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपातंर होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे होतील. उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाला नागरिकांना आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. तशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने या महामोर्चाचे नियोजन सुरु केले आहे.

महामोर्चाला अवघे दोन दिवस असताना पोलिसांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाला परवानगी नाकरली. महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन या महामोर्चावर ठाम असल्याची घोषणा केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवरचा रोष व्यक्त करण्यासाठी मोर्चात सामील व्हा, असे आवाहन विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले. ते म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्री फुले यांच्याबाबत झालेली वादग्रस्त वक्तव्ये, महागाई आणि बेरजोगारी या सर्वांविरोधात हा महामोर्चा निघणार आहे. हा राजकीय मोर्चा नाही. या मोर्चात विध्वंसक काहीही होणार नाही. शांततेत हा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा समस्त महाराष्ट्रातील जनतेचा आहे. जनतेने मोठ्या संख्यने मोर्चाला उपस्थित राहण्याच आवाहन अजित पवारांनी केले.

पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा मोर्चा निघणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोर्चाला हिरवा कंदिल दाखवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button