‘देशात पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय’; भाजप नेत्याचं मोठं विधान
![Madhukar Chavan said that there is a conspiracy to kill Prime Minister Modi in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Narendra-Modi-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच, भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. देशात पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय, असं मधुकर चव्हाण म्हणाले. ते गुहागर येथे बोलत होते.
मधुकर चव्हाण म्हणाले की, पुन्हा घडाळ्याचे काटे उलटे फिरायला निघाले आहेत. मोदींना ठार मारण्याचे कट जगामध्ये शिजत आहेत. मी जबाबदारीने बोलत आहेत. हा नेता पुन्हा भारताचा पंतप्रधान झाला तर जगात देश बलशाली होईल. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेवून कामाला लागला. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय.
हेही वाचा – भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
ज्या आंबेडकरांनी घटना निर्माण केली, सूर्यासारख्या तेजस्वी आंबेडकरांच्या पोटी प्रकाश आंबेडकरांच्या निमित्ताने काजवा जन्माला आलाय. तुम्ही भाजपाला शिव्या द्या, तुम्ही शिवसेनेला शिव्या द्या, तुम्ही आमच्या धोरणांवर टीका करा. शरद पवारांसारखा राजकीय धुडगूस महाराष्ट्रात कोणी घातला नाही, तुम्ही त्यांच्या बाजूला जाऊन बसलात. कुठे आलाय महाराष्ट्र? जरांगे पाटलासारख्या भंपक माणसाला उभं केलं, छगन भुजबळ मंत्री असतानाही त्यांना शिव्या दिल्या गेल्या, असं मधुकर चव्हाण म्हणाले.
अनंत गीते तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करताय? तुमचे नेतृत्व उद्धव ठाकरे हे लाचार आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत. पण उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात. सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकतात, असंही मधुकर चव्हाण म्हणाले.