लोकसभा रणसंग्राम: उमेदवारी न दिल्यास माढा, सोलापूर, बारामती आणि साताऱ्यावर पाणी सोडा!
माजी उमपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपाला इशारा
![Lok Sabha Battle: Leave Madha, Solapur, Baramati and Satara without nomination!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/jaysinh-mohite-patil-1-cGPQQ5.jpeg)
माढा : भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यांनी थेट भाजपविरोधातच शड्डू ठोकला आहे. मोहिते पाटील कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न दिल्यास, माढा, सोलापूर, बारामती आणि सातारा हे चार लोकसभा मतदारसंघ भाजपला गमवावे लागतील असा थेट निर्वाणीचा इशारा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वी मोहिते पाटील कुटुंबाने विद्यमान खासदार निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत भाजप नेतृत्वाने निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.
निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील समर्थकांनी या उमदेवारीला विरोध दर्शवित धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. भाजप मधील हा अंतर्गत वाद अधिकच पेटला जाऊ लागल्याने, भाजपचे नेते गिरीश महाजन अकलूज येथे दाखल झाले. त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी गुप्त बैठक केली मात्र प्रश्न काही मार्गी लागला नाही. मोहिते पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले.
महाजन यांनी काही दमबाजी करण्यापूर्वीच मोहिते पाटील कुटुंबाने आक्रमक भूमिका घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या फाईल काढा आम्हाला जेल मध्ये घाला आता आम्ही माघार घेणार नाही. ही निवडणूक मोहिते पाटील कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वाची आहे. आता आम्ही निवडणूक लढविली नाही तर आमचा गट जिवंत राहणार नाही. त्यामुळे आम्हाला उमदेवारी द्या आम्ही निवडणूक लढण्यास तयार आहोत. तुम्ही उमेदवारी नाही दिली तरी आम्ही निवडणूक लढणार आहोत. तुम्हाला काय कार्यवाही करायची ती करा, लोकांना कळू द्या उमेदवारीला विरोध केला म्हणून आम्हाला जेलमध्ये घातले, असा निर्वाणीचा इशारा दिल्याची चर्चा अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरून कानावर येत होती. मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने भाजप पुढे पेच निर्माण झाला आहे.
भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यांनी थेट भाजपविरोधातच शड्डू ठोकला आहे. मोहिते पाटील कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न दिल्यास, माढा, सोलापूर, बारामती आणि सातारा हे चार लोकसभा मतदारसंघ भाजपला गमवावे लागतील असा थेट निर्वाणीचा इशारा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह
भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यांनी थेट भाजपविरोधातच शड्डू ठोकला आहे. मोहिते पाटील कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न दिल्यास, माढा, सोलापूर, बारामती आणि सातारा हे चार लोकसभा मतदारसंघ भाजपला गमवावे लागतील असा थेट निर्वाणीचा इशारा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वी मोहिते पाटील कुटुंबाने विद्यमान खासदार निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत भाजप नेतृत्वाने निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.