breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी राम मंदिराच्या उद्घाटनाला येणार नाहीत, कारण काय?

Ram Mandir Ayodhya :अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे खूप वयस्कर आहेत. त्यांचे वय लक्षात घेता. आम्ही त्यांना न येण्याची विनंती केली होती. दोन्ही नेत्यांनी ते मान्य केलंय, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख सचिव चंपत राय यांनी दिली.

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारीपर्यंत तयारी पूर्ण केली जाईल आणि प्राणप्रतिष्ठापनेची पूजा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि २२ जानेवारीपर्यंत चालू असेल.

अयोध्येत राम मंदिर उभारले जावे यासाठी लालकृष्ण आडवाणी यांनी ९० च्या दशकात रथयात्रा काढली होती. त्यांच्या आंदोलनाचा मोठा फायदा राम मंदिराच्या वातावारण निर्मितीसाठी झाला होता. मुरली मनोहर जोशी यांचंही योगदान महत्त्वाचं होतं. रथयात्रेमुळे देशभरातील विविध राज्यांत धार्मिक हिंसाचार उफाळला. परिणामी अयोध्येत मोठ्या संख्येने जमाव जमला. याची परिणीती ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती.

हेही वाचा –  तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का? शर्मिला ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

माजी पंतप्रधान देवेगौडा यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी तीन सदस्यीय चमू तयार करण्यात आल्याचे चंपत राय यांनी सांगितले.यासह शंकराचार्य सुद्धा सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यासाठी सुमारे ४००० ऋषी आणि २२०० इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे.

अयोध्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी अभिषेक सोहळ्याची तयारी सुरू केली आहे. पीटीआयशी बोलताना महापालिका आयुक्त विशाल सिंह म्हणाले की, भाविकांसाठी फायबर टॉयलेट बसवले जातील आणि महिलांसाठी नेमलेल्या ठिकाणी चेंजिंग रूम उभारण्यात येतील. राम जन्मभूमी संकुलात ‘राम कथा कुंज’ कॉरिडॉर तयार केला जाईल, ज्यात प्रभू रामाच्या जीवनातील १०८ घटना दर्शविणारी एक चित्रफीत दाखवली जाईल, .

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button