ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ‘धर्मवीर 2’ची घोषणा?

मुबई :‘ धर्मवीर 2’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

येत्या 9 ऑगस्ट रोजी ‘धर्मवीर’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मात्र हा चित्रपट राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रेक्षकांच्या भेटीला आणला जात असल्याची टीका काहींनी केली. निवडणुकीत फायदा व्हावा, या उद्देशाने हा चित्रपट प्रदर्शित केला जात असल्याचं म्हटलं गेलं. त्यावर आता निर्माते मंगेश देसाई यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “धर्मवीरच्या पहिल्या भागाच्या वेळीही असंच बोललं गेलं. असं सगळं घडणार होतं, म्हणून ‘धर्मवीर’ प्रदर्शित केला, असं म्हटलं गेलं. पण तसं काहीच नाही. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल लोकांनी जे किस्से सांगितले, त्याचं 72 तासांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. हे सर्व एका भागात कसं दाखवायचं, म्हणून आम्ही ‘धर्मवीर 2’ काढायचं ठरवलं होतं. त्याबद्दल माझी प्रवीण तरडेंसोबत चर्चा झाली होती. पहिल्या भागाचं शूटिंग साडेचार तासांचं झालं होतं. त्यापैकी तीन तासांचा चित्रपट तुम्ही पाहिला, मग उरलेल्या दीड तासाचं काय करायचं? त्या दीड तासात असे बरेच किस्से आहेत, जे प्रेक्षकांसमोर यायला हवेत.”

“पहिल्या भागाच्या वेळीच आमचं ठरलं होतं की दुसरा भागही शूट करायचा. एका पुरस्कार सोहळ्यात प्रवीणने मला सांगितलं की दुसऱ्या भागाची रुपरेषा तयार आहे. आपण पहिल्या भागातील बऱ्याच गोष्टी वापरू शकतो. तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की, तुला योग्य वाटत नसेल, म्हणजे तुला असं वाटत असेल की त्या सीनसाठीच आपण दुसरा भाग करतोय, तर मला त्यात अजिबात रस नाही. दुसऱ्या भागासाठी ते सीन्स योग्य बसत असतील आणि तुझं स्क्रिप्ट असेल तरच ते आपण करुयात. तेव्हा आम्ही दुसऱ्या भागाच्या तयारीला सुरुवात केली”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button