Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

..तर मला आरसीबी संघात जायला आवडेल; रिंकू सिंगचे मोठं विधान

Rinku Singh | यंदा आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी केकेआर संघाचा खेळाडू रिंकू सिंगने मोठं वक्तव्य केलं आहे. केकेआरने त्याला मेगा ऑक्शनपूर्वी रिलीझ केलं, तर त्याला कोणत्या संघात सामील व्हायला आवडेल? याबाबत रिंकूने भाष्य केलं आहे.

रिंकू सिंगने स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की केकेआरने त्याला रिलीझ केले, तर त्याला आरसीबी संघात जायला का आवडेल? यावर उत्तर देताना रिंकू सिंग म्हणाला, जर केकेआर संघाने आयपीएल २०२५च्या मेगा ऑक्शनपूर्वी मला रिलीझ केले, तर मला आरसीबी संघात जायला आवडेल. याचे कारण म्हणजे त्या संघात विराट कोहली आहे.

हेही वाचा    –      Pimpri Chinchwad | इंद्रायणी नदीत दोघांचा बुडून मृत्यू, अग्निशमन विभागाकडून शोधमोहीम सुरू 

दरम्यान, केकेआर संघाने २०१८ मध्ये रिंकू सिंगला ८० लाख रुपयांना विकत घेतले होते. तेव्हापासून केकेआरने रिंकूला आपल्याकडे कायम ठेवले आहे. त्यानंतर २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये रिंकूची किंमत थोडी कमी झाली आणि केकेआरने त्याला ५५ लाख रुपयांत पुन्हा त्याचा संघात समावेश केला. अशा प्रकारे रिंकू सिंग केकेआरसाठी बराच काळ खेळत आहे. मात्र, यंदा त्यांना केवळ काही मोजकेच खेळाडू रिटेन करता येणार आहे. हे लक्षात घेता केकेआर रिंकूला रिटेन करण्याची शक्यता फार कमी आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button