breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

श्रीरंग बारणेंची विजयी हॅट्रीक! १ लाख ४ हजार १३१ मतांची आघाडी

पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली होती. बारणे यांनी १ लाख ४ हजार १३१ मतांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी १ लाख ४ हजार १३१ मतांची आघाडी असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना ६,१७,७४१ तर संजोग वाघेरे पाटील यांना ५,१३,६१० एवढी मते मिळाली आहेत.

श्रीरंग बारणे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात लाखोंच्या फरकाने निवडून येणार हे आधीच सांगितलं होतं. माझ्यावर मतदारांनी विश्वास ठेवून कौल दिला आहे. महायुती आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पिंपरी- चिंचवड शहरातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला.

हेही वाचा    –    ‘मोदींचा नाही तर उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलो’; अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया 

पिंपरी- चिंचवडच्या एक लाख मतदारांनी मला पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील चित्र वेगळं असताना मला लाखोची लीड मिळाली आहे. विजयाचे श्रेय महायुतीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, मावळ मतदारांना आहे. हॅट्रिक होणार हे मी आधीपासून सांगत होतो. विरोधकाने वेगळं चित्र रंगवलं. ही निवडणूक नात्या- गोत्याची नव्हे तर देश हिताची होती. विरोधकांकडे दाखवण्यासाठी काम आणि चेहरा नव्हता. त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले पण त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली, असेही श्रीरंग बारणे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button