TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

बोगस डॉक्टरांच्या नियंत्रणासाठी कायदा अधिक कडक करण्यात येईलः वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

नागपूरः मागील वर्षभरात बोगस डॉक्टरांवर झालेल्या कारवायांची संख्या सातत्याने वाढते आहे. सामान्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणाऱ्या यातील अनेक डॉक्टरांना साधी अक्षरओळखही नाही. आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासाठी, वैद्यकीय जाळे अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असतानाही सामान्यांच्या आरोग्याशी होणारा हा जीवघेणा खेळ बोगस डॉक्टर खेळत आहेत. परिणामी बोगस डॉक्टरांच्या नियंत्रणासाठी कायदा अधिक कडक करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला.

राज्यभर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ करत आहेत. पोलिसांना थेट कारवाईचे अधिकार नसणे, कारवाईदरम्यान येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि महत्वाचे म्हणजे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांचे बोगस डॉक्टरांशी असलेले आर्थिक लागेबांधे आणि कारवाईत त्यांचा होणारा हस्तक्षेप या कारणांमुळे बोगस डॉक्टरांचे फावले आहे. अशा मुन्नाभाईंना कारवाईचे इजेक्शन देऊन, कारवाई करण्यासाठी कायदा अधिक कडक करण्यात येईल, असे मंंत्री महाजन यांनी सांगितले. Law to control bogus, doctors to be tightened:, Medical Education Minister Girish Mahajan

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button