breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लंके समर्थंकांचा राक्षसी पध्दतीने विजय साजरा

नगर : पारनेर तालुक्यातील महिलेस खा.निलेश लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या समर्थकांनी घरात जावून जातीवाचक शिवीगाळ असे कृत्य केले. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि राज्यात उमटले आहेत. या घटनेबाबत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

निलेश लंके यांचे समर्थक राक्षसी पध्दतीने आपला विजय साजरा करीत आहे. महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे यांचा प्रचार केला म्हणून हल्ले करणार्या लंके समर्थकांना ‘मोठी ताई’ पाठीशी घालणार की शिक्षा देणार असा खोचक सवाल सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसी पध्दतीने विजय साजरा करण्यास केलेली सुरूवात ही सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Modi 3.0 : मोदी मंत्रिमंडळाचा आज शपथविधी, महाराष्ट्रातून ही नावे?

निवडणुकीतील विजय पचवता आला पाहीजे आणि मिरवताही आला पाहीजे, सतेची हवा इतकी डोक्यात गेला असेल तर शिवरायांच्या पावनभूमीत तो कधीही सहन केला जाणार नाही. जिजाऊच्या लेकीच औरंग्याच्या अवलादींना धडा शिकवतील, असा इशारा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला आहे. याबाबत मोठ्या ताई त्यांना शिक्षा देणार की? पाठीशी घालणार असा खोचक सवाल सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button