breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल”; नवाब मलिकांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई |

सध्या राजकारणात पातळी सोडून एकमेकांवर टीका करण्याची मालिका सुरुच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद पेटलेला असतानाच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे कथित भ्रष्टाचार उघड करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. बातमी कशी होईल यासाठी किरीट सोमय्यांच प्रयत्न सुरूच असतात असे म्हणत मलिकांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. “चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे,” असे नवाब मलिक यांनी नांदेड येथे माध्यमांसोबत बोलताना म्हटले.

याआधी बोलताना किरीट सोमय्या यांनी मला नवाब मलिक यांना ‘गिफ्ट’ द्यायचंय असे म्हटले होते. “नवाब मलिक यांना मला काहीतरी भेट/बक्षीस (गिफ्ट) द्यायचं आहे. त्यांनी गेल्या महिन्यात असं काही सांगितलं की बीड जिल्ह्यात देवस्थानाची जमीन कुणाला तरी दिली गेली याची चौकशी करणार आहोत. खरं म्हणजे देवस्थानाची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. पण आता रायगडमधील कर्जत येथे देवस्थानच्या जमिनीचे सातबारा माझ्या हातात आले आहेत. आज मी जाऊन ते कन्फर्म करणार आहे. तसेच या देवस्थानची जमीन या व्यक्तीवर कशी गेली याची चौकशी झाली पाहिजे,” असे किरीट सोमय्या म्हणाले होते.

दरम्यान, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन शासकीय अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून फाइल्स तपासल्याने नवीन वादाला तोंड फुटले. सोमय्या यांनी माहिती अधिकारात फाइल्स तपासण्याची परवानगी घेतली नसेल, तर त्यांच्यावर शासकीय कार्यालयात बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याबद्दल आणि शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे. सोमय्या यांनी सोमवारी नगर विकास विभागातील कक्ष क्रमांक ११६ मध्ये काही फाइल्स तपासल्या. त्या वेळी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून या फाइल्स बघत होते.

सोमय्या यांनी कोणत्या फाइल्स कोणत्या अधिकारात तपासल्या, त्यासाठी परवानगी दिली होती का, माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता का, शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत ते का बसले होते, आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सावंत यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली. याप्रकरणानंतर किरीट सोमय्या यांनी याबाबत भाष्य केले. “त्यांना नेमकी भीती कसली आहे, कोणत्या कोणत्या फाईल तपासल्या त्याची की वायकरची फाईल होती, की सरनाईकची फाईल होती की अशोक चव्हाण यांची फाईल होती याची भीती आहे? मला वाटतं भीती ती आहे. आम्हाला जगभरातून माहिती मिळते. वेगवेगळ्या स्तरावरून लोक माहिती देतात. घोटाळेबाजांची माहिती दिली जाते. यात उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाण यांच्यापर्यंत समावेश असतो,” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button