breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयमहाराष्ट्रराजकारण

उदय सामंत यांचा धुळे दौरा, शिवसैनिकांची घोषणाबाजी, ताफा आडवण्याचा प्रयत्न अयशस्वी

  • उदय सामंतांच्या धुळे दौऱ्यात कात्रजची पुनरावृत्ती टळली

  •  शिवसैनिकांनी ताकद दाखवल्यानं पोलिसांची तारांबळ

धुळे । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

उद्योगमंत्री उदय सामंत हे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या सत्कार समारंभासाठी साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी सामंत यांना आमंत्रित केले होते. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी मंत्री उदय सामंत येत असताना त्यांना धुळ्यातील शिवसैनिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. शिवसेनेचे स्थानिक नेते शरद पाटील यांनी उदय सामंत यांच्यासह बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर टीका केली आहे. गद्दार आमदारांविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट असल्याचं ते म्हणाले.

काही आठवड्यापूर्वीच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये कथित शिवसेना समर्थकांनी हल्ला केला होता. त्यानंतर आज पुन्हा धुळ्यामध्ये हा शिवसैनिकांनी सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उदय सामंत यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार शरद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांचा धुळे जिल्हा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला आहे. शिवसेनेच्या जिल्हा मध्य मध्यवर्ती कार्यालयापासून शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ५० खोके एकदम ओके, तसेच गद्दार आमदारांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. नेत्यांसह शिवसैनिक रस्त्यावर उतरले, ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाण्याआधीच पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे पोलिसांची काही काळ तारांबळ उडाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button