ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनावर वक्तव्य

शेतकरी आंदोलनाबाबत क्तव्यावर भाजप पक्षाने कान टोचले

मुंबई : अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात नुकतंच पाऊल टाकलेल्या कंगना राणावत आता खासदार बनल्या आहेत. त्या नेहमीच चर्चेत असतात. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं होतं, असं वक्तव्य कधी केलं तर कधी मुंबईचा उल्लेख त्यांनी पीओके (पाकव्याप्त काश्मीर) असा केला. प्रत्येक वेळेस त्यांच्या खळबळजनक वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होतो. मात्र नुकतीच त्या शेतकरी आंदोलनाबाबत जे बोलल्या त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्यात. मात्र त्यानंतर त्यांच्या पक्षाने (भाजप) घरचा आहेर दिला. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाने कान टोचले. विशेष म्हणजे भाजपन अधिकृतपणे पत्र जाहीर करत याबाबत भूमिका मांडली.

काय म्हणाल्या होत्या कंगना राणावत ?

शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”, असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. “शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सर्वांनी बघितली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता”, असं कंगना यांनी म्हटलं होतं.

यानंतर भाजपने भूमिका जाहीर केली. कंगना राणावत यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप पक्षाशी काहीच संबंध नाही, असं भाजपने अधिकृत पत्र जाहीर करत म्हटलं. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपने भूमिका जाहीर केली.पण कंगना आणि वाद हे काही नवं समीकरण नाही, यापूर्वीही त्यांनी अनेक विषयांवर बेधडकपणे मत मांडल्याने वाद निर्माण झाला होता. त्या कोणकोणत्या विषयांवर काय बोलली ते जाणून घेऊया.

एअरपोर्टवर कानशिलात लगावली

खासदार झाल्यानंतर कंगना या 6 जून रोजी चंदिगड विमानतळावर पोहोचल्या, तेव्हा सुरक्षा तपासणीदरम्यान सीआयएसएफच्या महिला अधिकाऱ्याने त्यांना थप्पड मारली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होत. कंगना यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या वक्तव्याचा राग आल्याने त्या महिला अधिकाऱ्याने हे कृत्य केले होते.

भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं

कंगना यांनीने 11 नोव्हेंबर 2021 रोजी एका कार्यक्रमात असे विधान केले होते की, भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते आणि देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. कंगनांच्या या वक्तव्यानंतर लोकांनी त्यांना सर्वत्र ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि या वक्तव्यावरुन राजकारण सुरू झाले. वास्तविक 2014 साली भाजपच्या हातात सत्ता होती आणि त्यावेळी कंगना खासदार नसून पक्षाची समर्थक होत्या.

मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलं

कंगना यांनी 2020 मध्ये मुंबईबाबत वादग्रस्त विधानही केले होते. आपल्याला मुंबईत सुरक्षित वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी मला धमकावले आहे आणि मला मुंबईत परत न येण्यास सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यावर स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या आणि आता इथे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई पीओकेसारखी (पाकव्याप्त काश्मीर) वाटते. पोलिसांवरही त्यांनी भाष्य केले होते. मला फिल्म माफियांपेक्षा राज्य पोलिसांची भीती वाटते, त्यांच्या या विधानावरूनही बराच वादंग उठला होता.

नेपोटिझमवरून करण जोहरवर साधला निशाणा

2017 मध्ये जेव्हा कंगना जेव्हा ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये गेल्या होत्या, तेव्हा चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवर चर्चा झाली होती. करणने कंगना यांना विचारलं होतं की, इंडस्ट्रीमध्ये कोण-कोण नेपोटिझम करतं? त्यावर कंगना यांनी करण याचचं नाव घेतलं होतं. त्याचा उल्लेख मूव्ही माफिया असाही केला होता. घराणेशाहीचा हा मुद्दा पुढे बराच काळ चर्चेत होता.

बॉलीवूडबद्दलही केली अनेक वक्तव्य

कंगना बॉलीवूड इंडस्ट्रीच्या खूप विरोधात आहेत आणि त्या अनेकदा घराणेशाही, चित्रपट माफिया, बाहेरील व्यक्ती, पुरस्कार, आयटम सॉन्ग याविषयी विधान करत असतात. कंगना यांचे हृतिक रोशन आणि दिलजीत दोसांझसोबतचे उडालेले खटके हे तर सर्वांनाच माहीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button