breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

‘आदिपुरूष सिनेमावर बहिष्कार घाला’; कालीचरण महाराजांची मागणी

Adipurush : अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला आदिपुरूष सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत जगभरातून तब्बल ३४० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र यामधील काही संवाद आणि दृष्यांबाबत वाद सुरू झाला आहे. दरम्यान, या सिनेमावर बहिष्कार घाला अशी मागणी कालीचरण महाराजांनी केली आहे.

कालीचरण महाराज म्हणाले की, आदिपुरूष या सिनेमात दाखवण्यात आलेल्या घटना हिंदू विरोधी आहेत. तसंच देवाच्या चरित्राचा अपमान करणारे शब्द या सिनेमात वापरण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार निंदनीय आहे. हिंदूंच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदूंनी या सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे.

हेही वाचा – ‘बिपरजॉय’चं राजस्थानमध्ये थैमान, राजस्थानमध्ये ‘अशी’ आहे परिस्थिती..

Image

आदिपुरूष हा सिनेमा मी पाहिलेला नाही. जे लोक या सिनेमाला पाठिंबा देत आहेत ते धर्माविरोधी आहेत. ज्यांना वाटतं आहे ते धर्मप्रेमी आहेत. जे धर्मप्रेमी आहेत त्यांनी या सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे, असंही कालीचरण महाराज म्हणाले.

दरम्यान, सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी जे प्रमाणपत्र सेन्सॉरकडून दिलं जातं ते कसं काय दिलं? हा माझा प्रश्न आहे. तसंच इथून पुढे सेन्सॉर बोर्डाने अशा धर्मविघातक चित्रपटांवर बंदी आणावी आणि त्यांना प्रमाणपत्र देऊ नये अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रमुख अनिकेत शास्त्री यांनी ही मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button