‘दाऊदचा राईट हँड सलीम कुत्ताची १९९८ मध्येच हत्या’; कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक दावा
![Kailas Gorantyal said that Dawood's right hand Salim Kutta was killed in 1998](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Kailas-Gorantyal-780x470.jpg)
नागपूर : १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीमचा राईट हँड सलीम कुत्ता यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पार्टी करत होते, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. यावरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी खळबळजनक दावा विधानसभा परिसरात केला. सलीम कुत्तीची १९९८ मध्येच हत्या झाली असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.
कैलास गोरंट्याल म्हणाले, मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा राइटहँड समजला जाणारा सलिम कुत्ता याची १९९८ मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती. रोहित वर्मा, बाळू ठाकरे, संतोष शेट्टी यांनी सलीम कुत्ताची हत्या केली. सलीमला तीन बायका होत्या. टाडा कोर्टात त्याच्या तीनही बायकांनी आमचा पती सलीम कुत्ता मेला असून आमची संपत्ती परत करा, अशी विनंती केली होती.
हेही वाचा – न्याय हक्कांसाठी सोसायटीधारकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
त्यानुसार न्यायालयाने जप्त केलेली संपती सलीम कुत्ताच्या कुटुंबीयांना परत केली होती. परंतु, आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्तासाठी आयोजित पार्टीचा फोटो दाखविले आहे. तसेच हा सलीम कुत्ता १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचा दावा करताहेत, तो नेमका कोण, याबाबत गृहमंत्र्यांनी सविस्तर माहिती द्यावी, असे आमदार गोरंट्याल म्हणाले.