breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीला पहिला धक्का! ‘या’ नेत्याने दिला पदाचा राजीनामा
![Jitendra Awad resigned from his post](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/sharad-pawar--780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार अध्यक्षपदावरून निवृत्त होताच राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाण्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाण्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे पाठवण्यात आले आहेत. जितेंद्र आव्हाड मुंबईतील बैठकीला देखील उपस्थित राहिलेले नाहीत. शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.