Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

जेजुरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाईनी भरला अर्ज!

राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या दिग्गज नेत्यांची उपस्तीथी

पुरंदर | विजयकुमार हरिश्चंद्रे

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून लक्षवेधी ठरलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीतील नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रियेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गट आणि शरद पवार गटाने एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेजुरीमध्ये पंचवीस वर्षे निवडणूक लढवून नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे ज्येष्ठ नेते दिलीपदादा बारभाई यांचे सुपुत्र जयदीप बारभाई यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे दिग्गज नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जालिंदरभाऊ कामथे, प्रा दिगम्बर दुर्गाडे, वमानराव जगताप, संदिप आप्पा जगताप, रोहिदास कुंभार, रमेश लेंडे, गणेश निकुडे योगेश जगताप, माजी नगराध्यक्ष लता दोडके तसेच नगरसेवक उमेदवार आणि जेष्ठ नेते वर्ग उपस्थित होते.

हेही वाचा     :          IPL इतिहासातील सर्वात मोठी ट्रेड डील! सॅमसन CSK मध्ये, तर जडेजा व सॅम करन RR कडे 

अर्ज भरते वेळी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, जेजुरी च्या सर्व प्रथम लोक सुविधाना महत्व देऊन जेजुरी नगरीचा विकास करून खऱ्या अर्थाने स्वच्छ सुंदर सुविधा असलेली नगरीं बनवण्या चा मानस यावेळी व्यक्त जयदीप बारभाई यांनी मानस व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button