IPL 2026 | आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि चर्चित ट्रेड डील अखेर अधिकृतपणे जाहीर झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांनी केलेल्या या ब्लॉकबस्टर स्वॅपमध्ये तीन मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. विकेटकीपर-बॅट्समन संजू सॅमसन IPL 2026 सत्रासाठी CSK मध्ये सामील होत आहेत. त्यांना CSK ने ₹१८ कोटींच्या रिटेन्शन मूल्यात घेतले आहे. धोनीनंतर विकेटकीपर-बॅट्समन या महत्त्वाच्या भूमिकेत सॅमसनची निवड CSK साठी मोठा धोरणात्मक बदल मानला जात आहे.
CSKचा प्रमुख अॅलराउंडर रवींद्र जडेजा ₹१८ कोटी मूल्यात राजस्थानकडे रवाना झाला आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा स्टार अॅलराउंडर सॅम करनही RR मध्ये दाखल झाला असून त्यासाठी राजस्थानने CSK ला त्याची 2025 सत्रातील खरेदी किंमत म्हणजेच ₹२.४० कोटी अदा केली आहे.
हेही वाचा : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांची अपडेट समोर; उमेदवारांना मोठा दिलासा, नेमकं काय घेतला निर्णय?
IPL गव्हर्निंग कौन्सिलची मंजुरी
ही डील नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच चर्चेत होती. आज IPL गव्हर्निंग कौन्सिलने अधिकृतपणे मंजुरी दिल्यानंतर दोन्ही संघांनी सोशल मीडियावर याबाबत घोषणा केली. यामुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा आणि आश्चर्याची लाट उसळली आहे.
CSK ने अनुभवी संजू सॅमसनच्या रूपाने त्यांच्या फलंदाजी आणि नेतृत्वक्षमता आणखी मजबूत केली आहे, तर RR ने जडेजा आणि सॅम करन या दोन बहुउपयोगी अॅलराउंडर्समुळे संघाच्या संतुलनात मोठी भर घातली आहे. IPL 2026 सत्रापूर्वीची ही यंदाची सर्वात मोठी घटना ठरली असून, या बदलांचा आगामी हंगामात संघांच्या कामगिरीवर किती प्रभाव पडतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा