‘शिंदे सरकारचं हायकमांड देवेंद्र फडणवीसच’; भाजप आमदाराचं विधान चर्चेत
![Jaykumar Gore said that Devendra Fadnavis is the high command of Shinde government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/devendra-fadnavis--780x470.jpg)
सातारा : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सहभागी झाले आहेत. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचा मोठा गट असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं दिलं आहे. तर राष्ट्रवादीला अनेक महत्वाची खाती मिळाली आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील अनेक आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी मोठं विधान केलं आहे.
जयकुमार गोरे म्हणाले की, आपल्या भारतीय जनता पार्टीने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? हे सगळं आपल्या नेतृत्वाला माहिती आहे. तसेच या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत.
हेही वाचा – ‘पशुखाद्य उत्पादकांनी पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत’; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात भारतीय जनता पार्टीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.