‘बापाबद्दल बोलाल तर याद राखा’; जयश्री थोरातांचा सुजय विखेंना दम
![Jayashree Thorat said that if you talk about your father, remember it](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/jayashree-thorat-and-jayashree-thorat-780x470.jpg)
Jayashree Thorat | राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणंही अवघड झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का? अशी टीका भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरत यांच्यावर केली आहे. यावरून आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखेंना प्रत्युत्तर दिलं आहे. त्या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होत्या.
जयश्री थोरात काय म्हणाल्या?
संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. म्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचा स्वाभीमान आहेत. खबरदार! माझ्या बापाविषयी तुम्ही काही बोलले तर. ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार.
हेही वाचा – कोथरूडमधील विविध विकासकामांना कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे गती
तुमचं महायुतीचं सरकार जेव्हापासून आलं, तेव्हापासून त्रास चालू झाला. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं काही वाईट केलं नव्हतं. बाळासाहेब थोरात हे सर्वात जास्त काळ महसूलमंत्री राहिले आहेत. पण त्यांनी कधी कोणाचं वाटोळं केलं नाही. कोणालाही त्रास दिला नाही, अशी टीकाही जयश्री थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.