‘महाराष्ट्रात जे नेते नको आहेत त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा’; जयंत पाटील
![Jayant Patil said that it is BJP's practice to send leaders who are not wanted in Maharashtra to Delhi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Jayant-Patil-780x470.jpg)
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यासाठी एक योजना बनवली आहे. भाजपा महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.
भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते. दरम्यान यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – श्रीमंत व्हायचं असेल तर ‘या’ टिप्स एकदा वाचाच!
जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात जे नेते नको आहेत त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा आहे. हा त्याचाच एक भाग असू शकतो. त्याच्यापलिकडे या योजनेला फार काही महत्त्व आहे असं काहीच नाही.