Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली’; जयंत पाटलांचं येवल्यात मोठं विधान

नाशिक | राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. विविध पक्षांचे नेते राज्यभर दौरे करत आहेत, मेळावे आणि सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं जयंत पाटील यांनी नाशिकमधील येवला मतदारसंघातील मेळाव्यात बोलताना म्हटलं. दरम्यान, इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व आमदारांचा पराभव करण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. येवला विधानसभा मतदारसंघात पाच ते सहा जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता इच्छा व्यक्त करणाऱ्यांनी एकत्र बसा आणि एकमेकांना वचन द्या की एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरे पाठिंबा देतील. नाहीतर मला तिकीट नाही मिळालं की मी चाललो तिकडे (दुसऱ्या पक्षात). असे असेल तर आधीच सांगा. त्यामुळे सर्व मिळून एकसंघ राहा. शरद पवार देतील तो आपला उमेदवार हे समजून काम करा.

हेही वाचा    –    ‘लाडकी बहीण योजना महिलांच्या मतांसाठी जुगाड’; भाजप आमदाराचं अजब विधान 

तुतारी वाजवणाऱ्या माणसाला महाराष्ट्रात अचानक प्रचंड मागणी आली आहे. शरद पवार यांच्याकडे तुम्ही दोन तास जाऊन जरी बसले तर तुमच्या लक्षात येईल. आता परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त करत होता. मग मी त्यांना म्हटलं का काय झालं? तिकडे तर बरोबर चाललंय तुमचं. ते मला म्हणाले मतदारसंघात जरा फिरलं तर सर्वजण म्हणतात की तुतारी घ्या, तुतारी. नाहीतर आपलं काही खरं नाही. त्यामुळे आता तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात आपण वियजी होणार नाही असं अनेक मतदारसंघातील नेत्यांना वाटायला लागलेलं आहे. हीच शरद पवारांची ताकद आहे आणि हीच ताकद आपल्या सर्वांना येवला मतदारसंघात दाखवण्याचं काम करायचं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button