Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

जयंत पाटील राजकारणातील नारदमुनी, पवारांच्या घरफोडीतील मोरक्या: सुरज चव्हाण

मिशन विधानसभा : इस्लामपूर येथील सभेत जयंत पाटील यांच्यावर घणाघाती टीका

इस्लामपूर : देशाच्या विकासासाठी व देशहितासाठी अजितदादा पवार व सहकरी महायुती बरोबर आले,महायुती च्या पाठींबा पत्रावर जयंत पाटील यांची ही सही होती,पण त्याच्यातील विश्वासघातकी गुण वळवळला आणि ते गायब झाले,पण शरद पवार यांच्या घरफोडीतील मोरक्या जयंत पाटीलच आहेत,त्यांच्या विश्वासघातकी राजकारणाचा शेवट आता इस्लामपुर मतदार संघातील सुज्ञ मतदार करेल असेल मत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केले.

इस्लामपुर विधानसभा मतदार संघाचे महायुती चे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ येडेमच्छिंद्र येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी निशिकांत भोसले-पाटील म्हणाले की, या मतदार संघात सत्तेच्या जोरावर खर्‍या अर्थाने विद्यमान आमदारांनी मतदार संघाचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलणे आवश्यक होते. मात्र, विकासाचे राजकारण न करता शेतकर्‍यांचे प्रश्न सोडा पण शेतकर्‍यांच्या ऊसाला अपेक्षीत दर ही दिला नाही. ऐन दिवाळीत शेतकर्‍यांच्या घरी कशी दिवाळी साजरी झाली हे आपण पाहिले,अर्थिक शोषण करण्याबरोबर,युवकांच्या बेरोजगारीला हे नेतृत्व जबाबदार आहे.

निवडणुकी निमित्त मी दिलेला निर्धारनामा विचारपुर्वक तुमच्या हाती दिला आहे. या निवडणुकीत मला आशिर्वाद द्या पुढील पाच वर्षात निर्धारनाम्यातील सर्व कामे मार्गी लावण्याचे वचन मी तुम्हाला देतो. पुढील पाच वर्षात प्रत्येक मतदार मोकळा श्वास घेईल यासाठी कोणत्याही दबावाला. गुंडगिरीला बळी पडु नका मी तुमच्या प्रत्येक हाकेला हजर असेन ही क्रांती घडविण्याची वेळ आहे. यामध्ये प्रत्येक मतदाराचा मोलाचा वाटा असेल. सर्वत्र चांगले वातावरण आहे, असेही निशिकांत पाटील म्हणाले.

रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर खोत म्हणाले की, जयंत पाटील यांनी ऊस दराबाबत ब्र शब्द काढलेला नाही हे येथील कष्टकरी शेतकर्‍यांचे दुर्देव आहे. राजारामबापु कारखान्याची इतर कारखान्यापेक्षा रिकव्हरी जास्त आहे. सरासरी ६०० ते ७०० रुपये टनाला आपल्याला कमी मिळाले आहेत. हे राज्यातील इतर कारखान्याच्या दरावरुन स्पष्ट झाले आहे. कष्टाचे पैसे हाणणार्‍याला आता त्याची जागा दाखवुन द्या. भविष्यात शेतकर्‍यांच्या कष्टाचे पैसे मिळवुन देण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पुढे असो, एकदा परिवर्तन घडवा हि स्वाभिमानाची व न्यायाची लढाई आहे.

यावेळी केदार पाटील, रावसाहेब पाटील,विरेंद्र राजमाने,सागर मलगुंडे,राहुल खराडे,प्रशांत पाटील,दादासो पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘लक्ष्मी’’ नाकारु नका…

विरोधकांचे खुनशी, कपटी राजकारणामुळे व ३५ वर्षातील मतदार संघाच्या आद्योगतीमुळे प्रतिमा संपली आहे,आपलाच खिशा कापुन जमवलेली लक्ष्मी आपल्याच खिशात घालुन मताचे दान मागायला येतील ती लक्ष्मी आपल्याच कष्टाची आहे ती नाकारु नका मात्र मतदान भविष्यातील कष्टाच्या घामाचा दाम योग्य मिळण्यासाठी निशिकांत पाटील यांना मतदान करा आणि ३५ वर्षातील कुटील,व्देषी राजकारण करत कष्टकर्‍यांचा खिशा कापणार्‍याला त्याची जागा दाखवुन द्या, असेही सागर खोत यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button