#EknathShinde | तुम्ही शिवसेना तोडली तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का? जया बच्चान यांचा हल्लाबोल

Jaya Bachchan | स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केल्याप्रकरणी नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर सपाच्या खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जया बच्चन म्हणाल्या, की अशा प्रकारे जर बोलण्यावर बंधन लावलं तर तुमचं काय होईल? तुम्ही वाईट परिस्थितीत आहात. तुमच्यावर बंधने आहेत. तुम्हाला फक्त यावर बोलण्यास सांगितलं जाईल आणि दुसरे काहीही नाही, म्हणजे जया बच्चन यांची मुलाखत घेऊ नका. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? विरोधकांना मारहाण करणे, महिलांवरील बलात्काराच्या घटना, हत्येच्या घटना.
हेही वाचा : ‘वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरुन हटवा’; संभाजीराजे छत्रपती यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कुणाल कामराने गाण्याच्या माध्यमातून शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला असल्याचा आरोप शिवसेनेचे (शिंदे) नेते करत आहेत, असा प्रश्न जया बच्चन यांना माध्यामांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर त्या म्हणाल्या, तुम्ही (एकनाथ शिंदे) तुमचा खरा पक्ष सोडून सत्तेसाठी दुसऱ्या पक्षाबरोबर गेलात, मग तुम्ही शिवसेना तोडली, तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का? असा सवाल करत जया बच्चन यांनी जोरदार हल्लाबोल केला.