Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मला मतदान करा हे सांगायची वेळ सुप्रिया सुळे ताईंवर आलीये..?; चित्रा वाघ

मोदीजींची काळजी वाटत होती.. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींनाच पळावं लागतं, अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.

काय वेळ आलीये..? ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुरड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ सुप्रिया सुळे ताईंवर आलीये..? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती.. खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये तर…, असं चित्रा वाघ यांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात स्वागत आहे. पण मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना पाळायला लागते. ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावं लागतं. भाजपकडे मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button