breaking-newsपिंपरी / चिंचवडराजकारण

शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद

हडपसर : शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार संघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळेल, असा विश्वास माधुरी आढळराव यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अभिजीत बाबर, राष्ट्रवादीच्या नम्रता गोंदळ, रिपाइंच्या सरिता कुंभार, सरिता सोनवणे, छाया बोरूडे, राणी वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी माधुरी अक्षय आढळराव यांनी ससाणे नगर येथील रिपबलिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. तसेच ससाणे नगर येथील स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या वतीने त्यांचा स्वामींची मूर्ती देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी माधुरी अढळराव म्हणाल्या, आम्ही घरोघरी जावून शिवाजीराव अढळराव पाटील यांचा प्रचार करीत आहोत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हडपसर भागात महिलांचे प्रश्न, लाईट, पाणी, रास्ते, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे.  या अनेक प्रश्नांवर पुढील काळात काम करण्याची गरज आहे.

अभिजीत बाबर म्हणाले, विकासासाठी आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचां खासदार निवडून देणे गरजेचे आहे. मागच्या वेळी चूक झाली. संभाजी महारांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला जनतेने निवडून दिलं. या खासदारांनी गेल्या पाच वर्षात एकाही कार्यकर्त्यांने कोणाचाही फोन उचलला नाही. जो काही निधी आणला तो शिवाजीराव अढळराव पाटील यांनी आणला. शिरूर लोकसभा मतदार संघात तब्बल 700 गांव आहेत. अन् अस एकही गांव नाही जिथे आढळराव यांचा निधी पोहोचलेला नाही. त्यामुळे यंदा शिवाजीराव अढळराव पाटील हेच विजयी होणार, असा आशावाद बाबर यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button