Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

टॅरिफ वॉर झाल्यावर भारत झुकला नाही, अमेरिकेलाही मागे हटावे लागले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटावर, अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारावर तसेच टॅरिफच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भूमिकेवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गुलाम असल्याची टीकाही त्यांनी केली होती. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांचं आयुष्य एका कुटुंबाची गुलामी करण्यात गेलं, त्यांना देश कसा चालवायचा, सार्वभौम कसा ठेवायचा हे कसं माहीत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उर्जा सुरक्षा जपली आहे. तसं केलं नसतं तर भारताची अवस्था काय झाली असती हे आपल्याला ठाऊक आहे. टॅरिफ वॉरच्या दरम्यानही भारत अमेरिकेसमोर झुकला नाही कणखरपणे उभा राहिला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ अ‍ॅग्रीमेंट केले, त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांना देखील मागे हटावं लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी अशा प्रकारचं भाष्य करणे हास्यास्पद आहे.

हेही वाचा     :            कुडाळच्या शाळेत चिमुकल्यांना अभिनयाचे धडे 

आयसीसी टी२० वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाने भारताचा तिरंगा झेंडा फडकवला आहे. भारत पुन्हा चॅम्पियन झालेला आहे, काल अनेक रेकॉर्ड तोडत ज्या प्रकारे न्यूझीलंडचा पराभव भारताने केला, टी२० सामन्यांच्या इतिहासात फायनलमध्ये अशा प्रकारचा स्कोअर करणं आणि समोरच्या टीमला अशा प्रकारे गारद करणं हे देखील नवीन रॅकॉर्ड आहे.काल संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली त्यामुळे एक अतिशय सॉलिड फाउंडेशन भारताला मिळालं. बॉलिंगमध्येही जसप्रीत बुमराह यांनी ज्या प्रकारे पूर्ण सिरीजमध्ये, अतिशय इकॉनॉमीने बॉलिंग केली. कालही त्यांनी ज्या प्रकारे न्यूझीलंडच्या टीमला गारद केलं, ते विलक्षण अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button