breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘इंडिया’ आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक, २८ पक्षांची हजेरी

मुंबई : आजपासून मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होत आहे. आज संध्याकाळी या बैठकीला सुरूवात होणार आहे. या बैठकीसाठी एकूण २८ पक्षांचे नेते येणार आहेत. विविध राज्यातील हे नेते आहेत. बैठकीच्या पहिल्या दिवशी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केलं आहे.

मुंबईतील दोन दिवसीय बैठकीला २८ पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याआधी बंगळुरू येथे पार पडलेल्या बैठकीला एकूण २६ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. म्हणजेच मुंबईतील बैठकीत आणखी दोन पक्षांचा समावेश झालेला आहे. मात्र हे दोन पक्ष कोणते आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आघाडीची ही बैठक गुरुवारपासून सुरु होणार असली तरी शुक्रवारी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. गुरुवारी आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांत अनौपचारिक चर्चा होणार आहेत. या दोन दिवसीय बैठकीत समन्वय समिती तसेच आघाडीच्या प्रचारासाठी कार्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘शरद पवारांनी आता रिटायर व्हावं’; सायरस पुनावाला यांचा सल्ला, राजकीय चर्चांना उधाण!

असा असणार संपुर्ण कार्यक्रम

  • ग्रँड हयात हॉटेलमध्ये १०० हून अधिक रुम बुक करणअयात आले आहेत. हॉटेलच्या आसपासच्या हॉटेलमधील रुमही बुक करण्यात आले आहेत.
  • महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असली तरी उद्धव ठाकरे हेच या बैठकीच्या आयोजनाचं नेतृत्व करत आहेत.
  • तुतारी आणि नाशिक ढोल वाजवून या पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे.
  • आज संध्याकाळी सर्व नेत्यांची औपचारिक बैठक होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
  • महाविकास आघाडीने ही बैठक व्यवस्थित पार पडावी म्हणून १८ लोकांची एक टीम तयार केली आहे. तिन्ही प्रमुख नेत्यांच्या ६-६ नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
  • उद्या १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. त्यानंतर लंचनंतर दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button