राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण तापलेलं
मनोज जरांगे यांचा भाजप नेते गिरीष महाजन यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट
![In the state, Marathas, OBCs, communities, atmosphere, heated, Manoj Jarange, BJP, leader Girish Mahajan, gossip,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/girish-mahajan-780x470.jpg)
मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण तापलेलं आहे. दोन्ही समाजामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचं नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. हे सगळे एका माळेचे मणी आहेत, फायदा असला की आम्हाला गोड बोलत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर भाजप नेते गिरीष महाजन यांनी चर्चा करताना काय सांगितलेलं याबाबत जरांगे यांनी गौप्यस्फोट केलाय.
गिरीष महाजन डाव टाकतो आणि नंतर कायद्यात बसत नाही असं सांगत. गिरीश महाजन धोका देतो हे मला आधीच माहीत होते. सरसकट आरक्षण दिल्यास ओबीसी नेत्यांचे खूप दुखतंय असं गिरीश महाजन मला बोलले होते. सरकारने फसवले तरी मराठ्यांच्या लेकरांसाठी पुन्हा मी माझ्या जीवाची बाजी लावायला तयार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाचा जीव आरक्षणात आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सरकारने ठरवले आहे मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, मग आता मराठा समाजानेही ठरवले आहे की यांचा जीव सत्तेत आहे तर मग यांना सत्ताच द्यायची नाही. सरकारने आरक्षण दिले नाही तर मला माझ्या समाजाला सत्तेत बसवल्याशिवाय पर्याय नाही आणि यांना पडल्याशिवाय पर्याय नसल्याचं जरांगे म्हणाले.
शरद पवार आणि सरकार काय करतायत कळत नाही. हे सगळे एका माळेचे मणी आहेत, फायदा असला की आम्हाला गोड बोलतात, सध्या विरोधी आणि सत्ताधारी यांनी काहीच सुचत नाही, यांचे नुकसान झाल्यावर यांना कळेल सगळं, माझा समाज यांना धडा शिकवणार आहे. दिल्लीत नाहीत आणखी कुठं नेतील काहीही बोलतात, राज्यात कुणबी मराठा एक आहे, सगळं सारख आहे त्यामुळे आरक्षण दिलं पाहिजे. सगे सोयरे जर टिकत नाही तर मग जज आमच्याकडे कशाला आले होते? मराठा समाजाची एक नोंद सापडली तर त्याच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र दिली पाहिजे, तुम्ही त्यावेळी हे का मान्य केलं? असा सवाल जरांगेंनी केला आहे.