breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

पहिल्याच डावात मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रिय मंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली : अत्यंत चुरशीची निवडणूक ठरलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात भाजपाचे पहीलवान मुरलीधर मोहोळ यांचा मोठा विजय झाला आहे. या मतदार संघातील विजयाने त्यांना थेट केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे.

पुणे लोकसभा मतदार संघातून निवडूक लढविणारे मुरलीधर मोहोळ यांनी मोठा विजय मिळाला होता. त्यांना थेट महापौर पदावरुन पहिल्याच डावात खासदार ते थेट केंद्रिय मंत्रिपदाची माळ त्यांचा गळ्यात पडली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोरील प्रांगणात झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात केंद्रिय मंत्री पदाची शपथ घेतली.

हेही वाचा – IND vs PAK: जसप्रीत बुमराह ठरला गेमचेंजर, टीम इंडियाचा थरारक विजय, पाकिस्तानवर 6 धावांनी मात

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा. 86,369 मतांनी पराभव केला होता. 4,15,543 मतांनी त्यांचा विजय झाला होता. मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातील ब्राह्मण वस्ती असलेल्या पर्वती, कोथरुड परिसरातून मोठं मताधिक्य मिळाले. कोथरुड, पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत. त्यांच्या एकगठ्ठा मतांनी मुरलीधर मोहोळ हे थेट महापौर पदावरुन खासदार आणि खासदार पदावरुन थेट केंद्रिय मंत्री झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button