breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात ‘‘इन्कमिंग’’

संजोग वाघेरे यांचा प्रभाव : युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी शिवसेनेत सामील

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष वाढीवर भर दिला असता संजोग वाघेरे या नेतृत्वावर प्रभावित होत अनेक जण शिवसेनेत सामील होत असताना पिंपरी चिंचवड युवासेना शहर अधिकारी चेतन पवार यांच्या पुढाकारखाली युवा स्वाभिमान पार्टीचे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष अमोल जाधव, संपर्कप्रमुख तोफिक शेख, सचिव वाल्मीक थोरात आदींनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसेनेत युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी युवासेना सचिव वरून सरदेसाई, शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कोर कमिटी सदस्य योगेश निमसे, धनश्रीताई विचारे, राजोलताई पाटील, प्रांजल महाडेश्वर, विभागीय सचिव अविनाश बलकवडे, मावळ जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, पिंपरी चिंचवड शहर अधिकारी चेतन पवार, चिंचवड विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, पिंपरी विधानसभा प्रमुख शुभम मुळे,उपशहरप्रमुख मयुर पवार, संदिप लोंढे, सुमित निकाळजे, रोहन वाघेरे, विनायक दळवी, दीपक टकले, गणेश जोशी, गौतम लहाने, भाऊ साहेब जाधव आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

हेही वाचा – ‘राहुल गांधी वीर सावरकरांच्या भूमीत येत आहेत, त्यांचं..’; संजय राऊतांचं विधान

शिवसेनेचे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना महाविकास आघाडीतून मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असताना वाघेरेच्या प्रचारार्थ सर्व शिवसैनिक युवासैनिक पक्ष बांधणीवर भर देत असताना मावळ मतदारसंघात शिवसेनेला मोठी उभारी मिळत आहे तर उभारी मिळत असताना अनेक जण शिवसेनेच्या प्रवाहात सामील होत असताना पिंपरी चिंचवड युवासेना शहर अधिकारी चेतन पवार यांच्या पुढाकारखाली युवा स्वाभिमान पार्टीचे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष अमोल जाधव, संपर्कप्रमुख तोफिक शेख, सचिव वाल्मीक थोरात आदींनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसेनेत युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या उपस्थितीत खोपोलीतील महाविकास आघाडीच्या मावळ लोकसभा मतदारसंघाचा युवा महाराष्ट्र मेलाव्यात पक्ष प्रवेश केल्याने दिवसेंदिवस शिवसेना मावळ लोकसभा मतदारसंघात मजबूत होतानाचा पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button