Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दादांच्या दालनात सुनेत्रा पवार बनल्या राष्ट्रवादी विधिमंडळाच्या नेत्या, दोन ओळीचा ठराव अन ४६ आमदारांचा होकार

मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची शनिवारी औपचारिकपणे निवड करण्यात आली. विधिमंडळात दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी आमदारांच्या झालेल्या या बैठकीला उभय सभागृहांमधील ४९ पैकी ४६ आमदार उपस्थित होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी विधानमंडळ पक्षनेता निवडीचा ठराव मांडला. त्याला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीम, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ आणि संजय बनसोडे यांनी अनुमोदन दिले.

तत्पूर्वी अजित पवार यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पहार अर्पण केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे होते. तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार दौलत दरोडा यांच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने ते आज गैरहजर होते. आमदार रामराजे निंबाळकर आजारी असल्याने ते येऊ शकले नाहीत. आमदार धर्मरावबाबा अत्राम हे परदेशी दौऱ्यावर असल्याने बैठकीला गैरजहर हाेते.

सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य आहेत. विधिमंडळाच्या उभय सभागृहांपैकी एका सदनात त्यांना सहा महिन्यांत निवडून यावे लागणार आहे. अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून त्या पोटनिवडणूक लढवतील. त्यांची बिनविरोध निवड होईल, अशी शक्यता आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचा धाकटा मुलगा पार्थ पवार होता. दोन वाजता बैठक सुरु झाली आणि ३० मिनीटांनी संपली.

हेही वाचा –‘कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतापदी एकमताने निवड करण्यात येत आहे. विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेता म्हणून पक्षादेश (व्हीप) काढण्याचे तसेच विधिमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात येत आहेत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मांडलेले हे दोन ठराव होते.

अजित पवार हे वक्तशीरपणाबाबत काटेकोर होते. आजच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला सुनेत्रा पवार नियोजित वेळेप्रमाणे बरोबर दोन वाजता विधिमंडळात आल्या. येथील माध्यम प्रतिनिधी किंवा बैठकीत कुणाही आमदार व नेत्यांशी त्यांनी एक शब्दानेही संवाद साधला नाही. बैठक संपताच त्या विधिमंडळाबाहेर पडल्या. अजित पवार यांच्या दालनात आमदारांची ही बैठक पार पडली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button