ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘महापालिका नाट्यगृहाचे खाजगीकरण कोणाचे पुनर्वसन करण्यासाठी?’; इम्रान शेख

नाट्यगृहाचे खाजगीकरण मागे न घेतल्यास नाट्यगृहातील कार्यक्रम बंद पाडू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सोडून उर्वरित आचार्य अत्रे नाटयगृह, अंकुशराव लांडगे नाटयगृह, नटसम्राट निळू फुले नाटयगृह हया नाटयगृहांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. या खाजगीकरणाला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध असणार आहे.

यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की, खाजगीकरणामुळे नाट्यगृहाचे भाडेवाढ होऊन त्याचा परिणाम साहित्यिक कार्यक्रम, नाट्य प्रयोग करणाऱ्या संस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय कार्यक्रम व कामगार मेळावे,राजकीय पक्षांचे कार्यक्रम यावर परिणाम होऊ शकतो.महापालिका नाट्यगृहाचे खाजगीकरण कोणाचे पुनर्वसन करण्यासाठी करत असल्याचा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

हेही वाचा – पीएमआरडीएच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

यावेळी बोलताना चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड म्हणाले, महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा एकतर्फी निर्णय घेताना शहरातील कलाकारांना अथवा सामाजिक, राजकिय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊ नये. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आपणाविरोधात तीव्र अंदोलन घेण्यात येईल असा इशारा दिला आहे.

महापालिका उपायुक्त प्रदीप जांभळे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, युवक उपाध्यक्ष ओम शिरसागर, सचिव पियूश अंकुश, रुबान शेख, सनी वाघमारे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button