पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल, तर..; राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान

Rahul Gandhi | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पेटलेला संघर्ष आपण थांबवला असल्याचे सांगत आले आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यांनी या मुद्द्यावरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आपण भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवला या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यावर त्यांन जाब विचारण्याची ‘हिंमत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मोदी यांनी अमेरिकेला भेट देणे अपेक्षित होते…. पण ते जात नाहीयेत कारण त्यांना ट्रम्प यांची भीती वाटते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, जर पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी सांगावे की ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवले नाही.
हेही वाचा : शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार? उदय सामंत म्हणाले..
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हे एका धाडसी नेत्याचे उदाहरण होत्या. जर तुम्हाला पंतप्रधान कसा असावा हे समजून घ्यायचे असेल तर तुम्ही इंदिरा गांधींनी १९७१ साली काय केले होते ते पाहावे, जेव्हा त्यांनी तात्कालीन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले होते की, आम्ही तुम्हाला घाबरत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.
 
				 
 
 
 
 
 




