breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“जर कुणाला काही तक्रार असेल तर त्यांनी…”, मुंबै बँक घोटाळा चौकशीवरून अजित पवारांचा प्रविण दरेकरांना टोला!

मुंबई | 

राज्य सहकार विभागाने मुंबै बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ३ महिन्यांत यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका करताना आता पुणे जिल्हा सहकारी बँक आणि राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा देखील बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या मुद्द्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रविण दरेकर यांना टोला लगावतानाच संबंधितांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.

“प्रत्येक संस्थेबाबत कुणाची काही भूमिका असेल, तर केंद्र सरकार, राज्य सरकार त्याबाबतची चौकशी करू शकते. कुणाला जर काही वाटत असेल, तर त्यांनी त्याबाबतची तक्रार संबंधितांकडे करावी. ती तपासली जाईल. त्यात तथ्य असेल, तर ज्यांनी चुका केल्या, त्यांच्यावर कारवाई होईल. जर तथ्य नसेल, तर गैरव्यवहार आढळला नाही असं स्पष्ट होईल”, असं म्हणत अजित पवार यांनी प्रविण दरेकरांना टोला लगावला आहे.

  • घोटाळ्यांच्या महामेरूंना उघडे पाडू – प्रविण दरेकर

दरम्यान, याआधी प्रविण दरेकर यांनी आपल्यावरील चौकशीच्या आदेशांवर टीका करतानाच राज्यातील सहकार विभागातील घोटाळे बाहेर काढण्याचा एककलमी कार्यक्रम राबवणार असल्यचा इशारा दिला आहे. “तुम्ही बरबटलेल्या हातांनी चौकशी काय करणार? राज्य सहकारी बँकेची अर्धवट चौकशी पुन्हा सुरू करा. मी पत्र देणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाघोटाळा आहे. त्यांची खरेदी बघा. १५-२० कोटींचं सॉफ्टवेअर १५० कोटींना घेतलंय. राज्यातल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांची रीतसर तक्रार आम्ही करणार आणि घोटाळ्याच्या महाराष्ट्रातल्या महामेरूंना उघड करणार आहे. आता माझा एककलमी कार्यक्रम सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हा आहे”, असं दरेकर म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button