Pune : सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी पतीला टोळक्याकडून मारहाण
पुणे : माण गावच्या सरपंचपदाचा पत्नीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी १५ जणांच्या टोळक्याने पतीला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जीवे मारण्याची धमकी देत चार चाकीचे नुकसान केले आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री एकच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी सचिन मच्छिंद्र आढाव (वय ३९, रा.गणेशनगर, डांगे चौक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी बोडके, राज बहिरट, प्रदीप पारखी, सोन्या बोडके, सचिन बोडके (सर्व रा. माण, ता.मुळशी) यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन आढाव यांच्या पत्नी सरपंच आहेत. त्यांच्या पत्नीने सरपंच पदाचा राजीनाम द्यावा यासाठी आरोपींनी फिर्यादीच्या चार चाकीवर सिमेंटचे ब्लॉक मारून नुकसान केले. तसेच डोक्यात ब्लॉक मारले. जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.