breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘इंद्रायणी थडी’ महोत्सवात प्रचंड गर्दी, लाखो नागरिकांनी दर्शवली उपस्थिती

‘इंद्रायणी थडी’ महोत्सवात ग्राम संस्कृतीचे खास आकर्षण

पिंपरी चिंचवड| विशेष प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘इंद्रायणी थडी’ महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या धर्तीवर प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ही राम मंदिराची प्रतिकृती अनेक नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. हजारो लोक श्रीराम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी येत आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी आज सकाळपासून भजन महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. अनेक महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला.

इंद्रायणी थडीमध्ये बालजत्रा आणि लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था आहे. यात्रेत ग्राम संस्कृतीचे खास आकर्षण आहे. तसेच लहान मुलांच्या डान्सचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवकालीन सृष्टी आणि मावळ्यांचा इतिहास अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

इंद्रायणी थडी 2023 मध्ये ग्रामसंस्कृतीचे खास आकर्षण शहरातील नागरिकांसाठी निर्माण केले आहे. ग्रामसंस्कृती दाखवताना ज्वलंत पुतळे, डाकघर, भोसरीचे पूर्वीचे नाव भोजपुर या नावाने ग्रामपंचायत दाखवली आहे. नंदीबैल, शेती, मंदिर या विविध गोष्टी प्रकर्षाने दाखवल्या आहेत.

इंद्रायणी थडी 2023 महोत्सवातील विविध कार्यक्रम, स्टॉल, खाद्यसंस्कृती शहरातील नागरिकांना आकर्षित करत आहेत. यामुळे इंद्रायणी थडी मध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button