TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? खासदार राहुल गांधी यांचे भाजपावर गंभीर आरोप…

नवी दिल्लीः हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदाणी उद्योग समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. या पडझडीमुळे उद्योजक गौतम अदाणी मागील काही दिवसांपून चर्चेत आहेत. असे असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी गौतम अदाणींचा उल्लेख करत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्यात जवळचे संबंध आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले. ते आज (७ फेब्रुवारी) संसदेत बोलत होते.

“अगोदर मोदी अदाणी यांच्या विमानातून प्रवास करायचे. आता अदाणी हे मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात. अगोदर हे फक्त गुजरातमध्येच व्हायचे, नंतर हे भारतात सुरू झाले. अदाणी यांनी भाजपाला मागील २० वर्षांत निवडणूक रोखे तसेच अन्य मार्गाने किती रुपये दिले?” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

“कोणत्याही रस्त्याने चालत जा, हा रस्ता कोणी बांधला असे विचारले, तर अदाणींचे नाव पुढं येते. हिमाचल आणि काश्मीरमधील सफरचंद हेदेखील अदाणींचे आहेत. अदाणी आणि पंतप्रधान यांच्यात काय संबंध आहे, हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचे आहे,” असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अदाणींचे एक छायचित्र दाखवले.

“२०१४ पूर्वी अदाणी जगातील श्रीमंताच्या यादीत ६०९ व्या क्रमाकांवर होते. पण, २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यावर अदाणी काही वर्षांतच दुसऱ्या स्थानावर पोहचले. त्यांचे आणि पंतप्रधानांचे संबंध काय आहेत? २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू सुरू झाली. काही वर्षांतच अदाणी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचले,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button